अहिल्यानगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.३४ टक्के
1 min read
अहिल्यानगर दि.६:- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल (ता. ५) जाहीर झाला. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात बारावीची परीक्षा दिलेल्या ६० हजार ९३१ विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
म्हणजे जिल्ह्याचा निकाल ८६.३४ टक्के लागला आहे. यात ८१.४१ मुले तर ९२.५१ मुली उत्तीर्ण झाल्या. यंदाही उत्तीर्ण होण्यात मुलींनीच बाजी मारली. जामखेड तालुक्यातून सर्वाधिक तर नेवासा तालुक्याचा सर्वात कमी निकाल लागला.
*तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी* :- अहिल्यानगर ८५.९३ टक्के, अकोले ८८.४२, जामखेड ९४.८९, कर्जत ८७.१५, कोपरगाव ८८.२२, नेवासा ७७.३१, पारनेर ८६.२१,
पाथर्डी ८२.२९, राहाता ८९.८२, राहुरी ८६.५५, संगमनेर ९३.७०, शेवगाव ७६.६३, श्रीगोंदा ८८.५९ टक्के व श्रीरामपूर ८५.५१ टक्के निकाल लागला आहे.