आळेफाटा येथील उपबाजारात आज कांद्यास ११० रुपये बाजारभाव ; आवक वाढली बाजार घसरला
1 min read
बेल्हे दि.१२ :- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात शुक्रवार दि.१२ रोजी कांद्याच्या २७ हजार कांदा पिशवी ची आवक झाली असुन एक नंबर कांद्यास दहा किलोला १११ रूपये बाजारभाव मिळाला आहे.तर कांद्याची प्रत ओळखून त्याप्रमाणे योग्य बाजार भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांना केला आहे.जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयांत एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस १०० ते १११ रूपये बाजार भाव मिळाला होता तसेच एक नंबर गोळे कांद्यास ९० ते ११० बाजारभाव मिळाला. दोन नंबर कांद्यास ७० ते ९० रूपये बाजारभाव मिळला.
तर तिन नंबर कांद्यास दहा किलोस ५० ते ७० रूपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास दहा किलोस २० ते ५० रूपये बाजार भाव मिळाला व बदला कांद्यास दहा किलोस २० ते ४० रूपये बाजारभाव मिळाला आहे.तसेच सिंगल पत्ती मिडीयम कांद्यास दहा किलोस ५० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला आहे.दरम्यान सध्या आळेफाटा येथील बाजार समितीत नविन कांदा विक्रीसाठी आलेला असुन सध्या मिळणारा बाजारभाव अतीशय कमी असुन या मिळणा-या बाजारभावातुन शेतक-याचा झालेला खर्च देखील फिटत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला दिसुन येत आहे.