राजुरीच्या गणेश दूध संस्थेच्या व्हाइस चेअरमन पदी दिलीप घंगाळे यांची बिनविरोध निवड
1 min read
राजुरी दि.२५:- राजुरी (ता. जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध संस्थेच्या व्हाइस चेअरमन पदासाठी सर्वानुमते दिलीप घंगाळे यांची शुक्रवार दि.२५ रोजी बिनविरोध निवड झाली. या वेळी चेअरमन सुभाष औटी यांसह सर्व संचालक मंडळ संस्था सभासद, सचिव, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थित होते. चेअरमन पदाची निवड दि.९ रोजी सुभाष औटी यांची सर्वानुमते निवड झाली होती. चेअरमन व व्हाइस चेअरमन दोन्ही बिनविरोध निवड झाल्याने राजुरी हे एक आदर्श गाव असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.सन २०२५-२०३० च्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये श्री गणेश पॅनेल व परिवर्तन पॅनेल असे दोन पॅनेल विरोधात होते.
श्री गणेश पॅनेल व परिवर्तन पॅनेलचे समसमान संचालक निवडून आले होते. दोन्ही पॅनेलला समसमान ८ जागा मिळाल्या. एकूण १७ जागांसाठी निवडणूक पार पडली. सर्वसाधारण गटात १२ जागांसाठी २४ उमेदवार उभे होते. यामध्ये श्री गणेश पॅनेलकडून दिलीप महादू घंगाळे, बाळू यशवंत हाडवळे,
विक्रम नाथाजी डुंबरे, संजय अनंता औटी, मोहन भीमाजी हाडवळे, नीलेश मारुती हाडवळे हे विजयी झाले. तर परिवर्तन पॅनेलचे साईनाथ यशवंत हाडवळे, सुभाष विठ्ठल औटी, तुकाराम भाऊराव डुंबरे, गंगाराम मंजाभाऊ औटी, सुधीर लक्ष्मण डुंबरे, ज्ञानेश्वर महादू घंगाळे हे सहाजण निवडून आले.
इतर मागास प्रवर्ग या एका जागेसाठी श्री गणेश पॅनेलचे लक्ष्मण धोंडीभाऊ घंगाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जुन्नर तालुक्यातील गणेश सहकारी दूध उत्पादक संस्था ही सर्वांत मोठी संस्था आहे. देशपातळीवर या संस्थेचा गौरव झाला आहे. तसेच, अनेक पुरस्कारांनी या संस्थेला गौरविण्यात आले आहे.