वारुळवाडीच्या उपसरपंचपदी प्रकाश भालेकर

1 min read

नारायणगाव दि.२५:- जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रकाश गोविंद भालेकर यांची बिनविरोध निवड झाली.रिक्त उपसरपंचपदासाठी गुरुवारी (दि. २४) सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत एकमेव प्रकाश भालेकर यांचा नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. गणपीर ग्रामविकास पॅनल प्रमुख व उद्योजक संजय वारुळे, भागेश्वर ग्रामविकास पॅनल प्रमुख आशिष फुलसुंदर, सरपंच विनायक भुजबळ, माजी सरपंच राजेंद्र मेहेर व ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन केले. सरपंच विनायक भुजबळ यांनी उपसरपंचपदावर भालेकर यांची निवड झाली असल्याने आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी जालिंदर कोल्हे, सचिन वारुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन काळे, तंटामुक्ती उपाध्यक्ष शांताराम पारधी, संदीप अडसरे, अतुल कांकरिया, राजेंद्र कडाळे, रामचंद्र भालेकर, ग्रामपंचायत सदस्य रेखा फुलसुंदर, माया डोंगरे, राजश्री काळे, देवेंद्र बनकर, नारायण दुधाने, वैशाली मेहेर, मीना वारुळे, आत्माराम संते, ज्योती संते, किरण आल्हाट, सोनल अडसरे, जंगल कोल्हे, संगीता काळे, स्नेहल कांकरिया उपस्थित होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे