पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगर मध्ये दाखल
1 min read
जम्मू दि.२४:- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः श्रीनगर येथे पोहोचले.
तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळ असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली.
याठिकाणी अडकलेल्या काही पर्यटकांनी उपमुख्यमंत्री महोदयांशी फोनवरून संवाद साधून मदतीची मागणी केली होती. यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी खासदार मा.डॉ.श्रीकांत शिंदे चे स्वीय सहाय्यक अभिजीत दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख
राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला याठिकाणी अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी पाठवले.या मदतकार्याला वेग येण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी श्रीनगर येथे पोहोचून पर्यटकांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून सुखरूप आपल्याला लवकर घरी नेण्यात येईल.
त्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आल्याचे सांगत या सर्वांना मदतीचा आधार दिला. तर शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्यासाठी
आपल्या हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना यावेळी पर्यटकांनी व्यक्त करत शिंदे यांचे मनापासून आभार मानले.