पारनेरमधून अवैध वाळू वाहतूक करणारा जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 min read

पारनेर दि.१४:- पारनेर तालुक्यातील खडकवाडी परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रोहित शाहूराज साळवे (वय २६, रा.कासारे, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.आरोपीकडे अधिक चौकशी केली असता अमोल रक्टे (पूर्ण नाव माहित नाही (फरार) व ढम्पर मालकाचे नाव बापू बोरूडे असल्याचे सांगितले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, रमीज आत्तार, मनोज लातुरकर यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे