दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
1 min read
निमगाव सावा दि.१४:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. उद्योजक संभाजी चव्हाण यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, प्रकाश चव्हाण माजी उपसरपंच पारगाव, प्रगतशील शेतकरी जानकू चव्हाण, उद्योगपती जीवन चव्हाण, कला शाखाप्रमुख प्रा.सुभाष घोडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ, शांताराम गाडगे, अनिकेत वायकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. सुभाष घोडे यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून साकारलेली भारतीय राज्यघटना ही एक आपल्या देशासाठी मिळालेला अनमोल ठेवा आहे.
त्याचा आपण सर्वांनी सन्मान ठेवून त्यानुसार आचरण केले पाहिजे असे मत व्यक्त केले.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या.