मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये हनुमान जन्मोत्सव; विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण
1 min read
आणे दि.१२:- प्रभू श्रीरामांचे परमभक्त पवनपुत्र हनुमान यांची जयंती मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) येथे शनिवार दि.१२ मोठ्या भक्तिभावाने विद्यालयात साजरी करण्यात आली. या वेळी ९०० विद्यार्थ्यांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण केली. पवनपुत्र हनुमान यांच्या जन्मोत्सवाची कथा शाळेतील शिक्षिका अर्चना भुजबळ यांनी आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना सांगितली.
अभिमन्यू बांगर या विद्यार्थ्याने मारुती स्तोत्र सादर केले तसेच इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी हनुमान चालीसा सादर केली. हनुमान जी हे शक्ती, भक्ती, धैर्य व बुद्धीचे प्रतीक आहेत हे प्राचार्य विद्या गाडगे यांनी आपल्या मनोगता मध्ये सांगितले.
संस्थेचे चेअरमन गोपीनाथ शिंदे, संस्थापक सीए सावकार गुंजाळ, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, प्राचार्य विद्या गाडगे, उपप्राचार्य के. पी. सिंग यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.