वादळी चर्चेनंतर अखेर वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

1 min read

नवी दिल्ली दि.३:- बहुचर्चित असलेलं वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. बुधवारी दिवसभर चाललेली वादळी चर्चा आणि आरोप प्रत्यारोपानंतर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात झालं आहे. मध्यरात्री 1.56 वाजता हा ऐतिहासिक निर्णय झाला. या विधेयकाच्या बाजूने 288 तर 232 एवढी मतं पडली. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं. अखेरीस मध्यरात्र उलटल्यावर झालेल्या मतदानामधून वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात झालं.सुरुवातीला विरोधी पक्षांमधील सदस्यांनी विधेयकात सुचवलेल्या दुरुस्त्यांबाबत आवाजी मतदानाची मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर या विधेयकावर दिवसभर चर्चा झाली. विरोधी पक्षांमधीन अनेक नेत्यांनी या विधेयकामध्ये दुरुस्त्या सूचवल्या. त्यावर देखील चर्चा झाली. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, काँग्रेसचे गौरव गोगोई, इम्रान मसूद, राजीव रंजन यांनी अनेक मुद्दे मांडले. मात्र, या सुचवलेली दुरुस्ती आवाजी मतदानाने फेटाळून लावण्यात आल्या. अशातच विधेयकावर प्रत्यक्ष मतदान पार पडलं. एकूण 520 सदस्यांनी मतदान केले. यामध्ये या विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 एवढी मतं पडली.अखेर, वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मध्यरात्री 1.56 वाजता मंजूर झालं. विधेयकावर मतदान 1 तास 50 मिनिटे चाललं. विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली, तर विरोधात 232 मतं पडली. विधेयक मंजूर झाल्यानंतर काँग्रेससह विरोधी खासदारांनी नाराजी व्यक्त केली. तर भाजपने याचं स्वागत केलंय. वक्फ (दुरुस्ती) विधेयक ही एक नवी आशा आहे. गरीब मुस्लिम कुटुंबांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आणि २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता मिळाली; गेल्या ७५ वर्षांत नऊ लाख एकरपेक्षा जास्त जमीन फक्त २०० लोकांच्या हाती देण्यात आली… काँग्रेसने कधीही गरीब मुस्लिम कुटुंबांना फायदा व्हावा यासाठी काम केले नाही, असं भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे