म्यानमार भूकंप १००० मृत्यू, २३७६ जण जखमी, दूरसंचार, दळणवळण जनसंपर्क यंत्रणा ठप्प
1 min read
दिल्ली दि.३०:- म्यानमारमधील मंडले जवळ 7.7 तीव्रतेचा भूकंप शुक्रवारी, 28 मार्च रोजी आला. यातील मृतांची संख्या 1,000 च्या वर गेली आहे, तर 2,376 जण जखमी झाले आहेत. मंडले शहरात विशेषतः मोठा विध्वंस झाला असून, इमारती, पूल आणि रस्ते कोसळले आहेत. या आपत्तीमुळे म्यानमारच्या सैन्य सरकारने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे आणि आंतरराष्ट्रीय मदतीची विनंती केली आहे. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला, मंडाले सह विविध शहरे आणि ग्रामीण भागात मोठा विध्वंस झाला आहे. आणि अनेकांचे प्राण गेले.
या भूकंपानंतर 6.4 तीव्रतेचे आफ्टरशॉक आले, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. दूरसंचार, दळणवळण जनसंपर्क यंत्रणा ठप्प झाली असून अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेमार्ग उध्वस्त झाले आहेत.