लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस आळेफाटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1 min read
आळेफाटा दि.३०:- एक वर्षापासून फरार असलेल्या बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या अहमदनगर येथील आरोपीस आळेफाटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या.घारगाव (ता.संगमनेर) पोलीस स्टेशन अहमदनगर येथील नवनाथ आनंदा चव्हाण (वय 40 राहणार संगमनेर, जी. अहमदनगर) याचे विरुद्ध घारगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 117/2022 भा.द.वी कलम 376 (2 )(1) बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 20121 चे कलम 4 अनुसूचित जाती जमाती कायदा कलम 3 (2) (5 ) इतर कलमान्वये गुन्हा दाखल होता.
सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होता. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये फरारी पाहिजे आरोपींची शोध मोहीम सुरू असताना घारगाव येथे नमूद वर्णना च्या आरोपीची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशन कडे प्राप्त होती.
रविवार दि.३० रोजी पोलीस नाईक पंकज पारखे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत तांगटकर हे यांना नवनाथ आनंदा चव्हाण हा पिंपळवंडी या ठिकाणी येणार असल्या बाबतची गोपनीय माहिती बातमीदार मार्फत मिळाल्याने पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन कडील 2 पथक तयार करून रवाना केले होते.
सदर आरोपीस पारखे व तांगडकर या पोलीस अंमलदार यांनी ताब्यात घेतले. सर्व खात्री अंति घारगाव पोलीस स्टेशनचे पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात नवनाथ चव्हाण यास दिलेले आहे. सदरची फरारी पाहिजे आरोपींच्या अटकेची मोहीम यापुढेही सतत सुरू राहणार आहे.