आळेफाटा पोलीसांची अवैध गुटख्यावर धडक कारवाई; राजुरीतील एकाला अटक

1 min read

आळेफाटा दि.२:- मोटारसायकल वरून गुटखा घेऊन जाणार आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केला असून त्याकडून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी की, आळेफाटा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करत असताना (आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) येथील अहमदनगर- कल्याण हायवे रोडवरील एस.टी. स्टॅंड येथे एक इसम हा त्याचे मोटार सायकलवर पांढरे रंगाच्या गोणी घेवुन अहमदनगर बाजुकडे जाताना दिसला.

त्यावर संशय आल्याने सदर इसमास थांबवुन त्याचेकडे विचारपुस केली असता तो त्याची मोटार सायकल सोडुन तेथुन पळुन जावु लागला. तेव्हा त्यास पोलीसांनी पकडुन ताब्यात घेतले व सदरचे पांढरे रंगाच्या गोण्यांमध्ये पाहिले असता सदरचे गोण्यांमध्ये महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधीत केलेला गुटखा मिळुन आला.

तेव्हा त्यास आळेफाटा पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचे पुर्ण नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव बाळु मारूती औटी (वय ४५ वर्षे, रा. राजुरी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे असल्याचे सांगितले. त्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशन येथे सदरचे आरोपी विरोधात पोलीस अंमलदार प्रदिप गर्जे यांनी फिर्यादी दिली आहे.

त्याप्रमाणे आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २०५/२०२३, भा.द.वि. कलम २७२, २७३,३२८, व अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२), २६ (४), ३० (२) (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्यामध्ये एकुण मोटार सायकलसह ५५,५००/- रू चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.

तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार हे करत असुन सदर गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.
सदर कारवाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, सहा पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे, पोलीस नाईक संतोष दुपारगुडे, पोलीस अंमलदार प्रदिप गर्जे, प्रविण आढारी, महिला पोलीस अंमलदार शोभा आहेर यांचे पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे