श्रीगोंद्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार निलंबित
1 min read
श्रीगोंदा दि.२७:- श्रीगोंदा येथील महसूल विभागातील तहसीलदार आणि नायब तहसीदार पदावरील दोन अधिकाऱ्यांचे एकाच वेळी निलंबन झाल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे श्रीगोंद्याच्या तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांचे आज निलंबन करण्यात आले आहे. शासकीय जमिनीची परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात दोषी धरत या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे एकाच वेळी दोन तहसीलदार दर्जाचे अधिकारी निलंबीत होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
श्रीगोंदा तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत वादात राहिल्या होत्या त्यांच्या निष्क्रिय कार्यपद्धती बाबत लोकांमध्ये नाराजीचा सूर होता काही महिन्यांपूर्वीच श्रीगोंदा शहरानजीक असलेल्या एका जमिनीची परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणात
तहसीलदार डॉ वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांना दोषी धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे महसूल व वनविभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी या दोन्ही तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश आज काढले आहेत.
श्रीगोंद्यातील एक मंडल अधिकारी आणि एका तलाठ्याचे या प्रकरणात आधीच निलंबन झालेले आहे.श्रीगोंदा शहरा नजीक असलेल्या दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ खाईस्ट इतर वेस्टर्न इंडिया या संस्थेची मालक हक्क असलेल्या जमीनी वरून त्यांचे नाव कमी करून दि कॅनेडियन प्रेस ब्रिटेरियन मशीन या संस्थेचे नाव लावले.
एका शासकीय संस्थेची जमीन एका खासगी व्यक्तीच्या नावे मालकी हक्क करण्याबाबत चा आदेश परीत करून अनियमितता केल्याबद्दल आणि सदर प्रकरणात शासकीय कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्यामुळे कर्तव्यात कसूरी करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९मधील नियम ३ चे उल्लंघन केले.
असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा(शिस्त व अपील)नियम १९७९मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशीची कार्यवाही करण्याच्या अधीनतेने तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि श्रीगोंदा नायब तहसीलदार अमोल बन यांना निलंबीत करण्यात आले आहे.