पाडळी आळे च्या तलाठ्याला तीन हजारांची लाच घेताना अटक
1 min read
पारनेर दि.२६:- शेत जमिनीची वारस नोंद लावण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथील तलाठ्यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.२४) ताब्यात घेतले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद प्रभाकर घोरपडे (वय ३४, रा. पाइपलाइन हडको एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.कळस येथे तक्रारदार यांच्या आत्याचे पती यांच्या नावे शेत जमिनीचे दोन गट आहेत.
तक्रारदाराच्या आत्याच्या पतीचे निधन झाल्याने शेत जमिनीला वारस नोंद लावण्यासाठी पाडळी आळीचे तलाठी यांच्याकडे सर्व कागदपत्रे एक महिन्यापूर्वी दिले होते. वारस नोंद लावण्याकरिता तलाठी घोरपडे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली.
मात्र, तक्रारदारांनी नगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.