पिकअप चोरणारे तिघे जेरबंद
1 min read
शिक्रापूर दि.२६:- पिकअप चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याबाबत आयुब शेखलाल तांबोळी (वय ४७ रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला होता. असिफ अब्दुल रफिक (वय ४३ रा. अमरधाम रोड नाशिक), मुजाहिद उर्फ बबलू नजीर मलिक (वय ३० रा. आळेफाटा ता. जुन्नर जि. पुणे) व सद्दाम अकबर शेख (वय ३२ रा. मुकुंदनगर जि. आहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून पोलिसांनी पिकअप जप्त केला आहे.
कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील आयुब तांबोळी यांनी घरासमोर लावून ठेवलेली पिकअप गाडी चोरट्यांनी चोरुन नेली होती. नाशिक येथे एक संशयित पिकअप मिळून आल्याने नाशिक पोलिसांनी पिकअप चालकांकडे चौकशी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला.