खोक्याला बिर्याणी खायला देणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित; जिल्हा कारागृहाबाहेर व्हीआयपी ट्रीटमेंट देणे पोलिसांच्या अंगलट

1 min read

बीड दि.२५:- आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याभाईलाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे समोर आले आहे. खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी, सोबत डझनभर नातेवाइक असा लवाजमा असलेला एक कथित व्हिडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरला झाला आहे. तसेच मोबाईलवर अनलिमिटेच बोलण्यासही त्याला मिळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा एक कथित व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. खोक्याला दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या हा कारागृह परिसरात खाली बसून जेवण करत आहे. त्याच्या बाजूला १० ते १५ नातेवाइक, कार्यकर्ते उभे दिसत आहेत. हे सर्व असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलिस वादात सापडले आहेत. बोलण्यासाठी मोबाइलही दिला न्यायालयीन कोठडीत असलेला खोक्या हा जेवणानंतर फोनवर बोलत नातेवाइकांकडे जातो. सोबत एक पोलिस कर्मचारीही असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, खोक्याला तुरूंगात मदत करणारे ते दोन पोलीस कर्मचारी निलंबित होणार आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यालाही अधीक्षकांकडून कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे म्हटले आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची शाही बडदास्त ठेवणे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भोवणार असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसात बीडचे पोलीस दल सातत्याने वादात राहिले असून आता त्यामध्ये या नव्या वादाची भर पडली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे