नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला

1 min read

अहिल्यानगर दि.२२:-अहिल्यानगर मधील साईनगर परिसरात शनिवार (दि.२२) पहाटे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले पाच ते सहाजण आले होते. मात्र, योगेश चांगेडिया व त्यांची पत्नी यांच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरांनी आणलेले चारचाकी वाहन तेथेच घटनास्थळी सोडून पळ काढला आहे. कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.कोतवाली पोलीस ठाणे हददीत असलेल्या साईनगर परिसरात योगेश चंगेडिया यांचे घर आहे. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाच ते सहाजण हातात कटावणी घेऊन दरोड्याच्या तयारीत असल्याचे चंगेडिया यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्यांच्या शेजारी असलेल्या अतुल मुळे यांना घटनेबाबत माहिती दिली. त्यामुळे दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याने तेथून पळ काढला. तसेच त्यांनी आणलेली चारचाकी वाहन विनायकनगर परिसरात बेवारस आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. मात्र, याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे