समर्थ मधील जेष्ठ नागरिक कार्यशाळेला १०० ज्येष्ठांची उपस्थिती; चला आनंदाने जगू या :- अनिल गुंजाळ

1 min read

बेल्हे दि.१५:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे बहि:शाल विभाग व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जेष्ठ नागरिक कार्यशाळा नुकतीच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाली.

अनिल गुंजाळ यांनी जेष्ठ नागरिकांना आपल्या विनोदी शैली व मनोरंजक किस्स्यातून मनमुराद निखळ आनंद दिला. आयुष्य किती सुंदर आहे आणि त्याचा उपभोग हसत हसत आनंदाने घ्यायला हवा.’चला आनंदाने जगू या ‘या विषयावर ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधला.हास्य हेच निरोगी आयुष्याचे रहस्य असून हास्यातून मनोरंजन आणि मनोरंजनातून आरोग्य हेच यशस्वी जीवनाचे सूत्र असल्याचे अनिल गुंजाळ म्हणाले.दत्तात्रय पायमोडे यांनी “कविता काही माझ्या काही तूझ्या,कविता गालावरच्या खळीपासून गर्भातील कळीपर्यंत” सादर केल्या.‘सकस संतुलित आहार व आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी डॉ.दिलीप कचेरे यांनी ज्येष्ठ नागरिकांचा वार्म अप करून घेतला.त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत शारीरिक हालचालींचे मार्गदर्शन यावेळी त्यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना केले.ज्येष्ठ नागरिक समाज व्यवस्थेचे मार्गदर्शक असतात.त्यांच्या अनुभवाचा ठेवा आपण जपावा.तसेच समाज उपयोगी विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची भूमिका महत्त्वाची असून संस्कृती,रूढी-परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी त्यांची समाजाला नितांत गरज असल्याचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार म्हणाले.यावेळी संस्थेच्या वतीने समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या सहकार्यातून ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.यावेळी तांबेवाडी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष धोंडीभाऊ नारायण कुंजीर (पोलीस पाटील),उपाध्यक्ष भाऊशेठ बांगर,सचिव चंद्रकांत हांडे,गुंजाळवाडी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बबन बोरचटे,उपाध्यक्ष बारकूशेठ बोरचटे,भागुजी शिंदे,गोपीनाथ शिंदे,पांडुरंग गगे, नामदेव गगे,राजुरी जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष बबन घंगाळे, उपाध्यक्ष लक्ष्मण औटी,राजुरी ग्रामपंचायत सदस्य सखाराम गाडेकर,बाळासाहेब हाडवळे,दत्ता नाना शेटे,भाऊ औटी,रामदास शेठ गंधट,तुकाराम औटी,पांडुरंग हाडवळे,रतन औटी,ममताराम हाडवळे,रामदास ताजवे,कवी बाळासाहेब ताजवे,सिताराम हाडवळे,सावळेराम हाडवळे आदि कार्यशाळेस उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.कुलदीप रामटेके,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.गणेश बोरचटे,कार्यक्रम अधिकारी प्रा.हर्षदा मुळे तसेच सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख,

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.उत्तम शेलार यांनी सूत्रसंचालन प्रा.प्रदिप गाडेकर यांनी तर आभार डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे