राज्य मराठी पञकार परिषद महाराष्ट् प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रविण महादेव शिंदे तर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी अरुण मंच्छिद्र कुरे
1 min read
आंबेगाव दि.१:- प्रविण महादेव शिंदे यांची राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. व अरुण मंच्छिद्र कुरे यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड झाली व आंबेगाव तालुका अध्यक्षपदी किसन सोपान टाव्हरे यांची निवड करण्यात आली असुन. आज त्यांना सन्मान चिन्ह व ओळखपञ आणि त्यांचे पदाचे प्रमाणपञ देण्यात आले आहे. किसन सोपान टाव्हरे यांची राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश आंबेगाव तालुका अध्यक्षपदी निवड तर जुन्नर तालुका अध्यक्षपदी मयुर ढोबळे यांची निवड करण्यात आली आहे.
खेड आंबेगाव,जुन्नर दि. २८ फेब्रुवारी – राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेशच्या आंबेगाव तालुका अध्यक्षपदी किसन सोपान टाव्हरे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड परिषदचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी केली असून, त्यांना नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
किसन टाव्हरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून, त्यांनी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पत्रकारितेच्या मूल्यसंवर्धनासाठी प्रयत्न होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल किसन टाव्हरे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.व सर्व पञकार बांधव यांना पुढील वाटचालीस खूप प्रमाणिक काम नवनिर्वाचीत सदस्य पदाधिकारी यांना काम करण्यासाठी शुभेच्छा केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसुदन कुलथे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि शुभेंच्छा दिल्या आहेत.