अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 दरम्यान होणार

1 min read

मुंबई दि.२४:- महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत होणार असून दोन्ही सभागृहात दि.10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.काल विधानभवनात आयोजित विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दि. 8 मार्च सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील. तर 13 मार्च होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे