श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीचा निरोप समारंभ संपन्न

1 min read

निमगाव सावा दि.९:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा, ता. जुन्नर, जी. पुणे. महाविद्यालयात इयत्ता बारावी वाणिज्य व विज्ञान वर्गाचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री पंढरीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोखरी येथील विद्यार्थी घडविणारे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक मा. एम. डी. मुलाणी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे व ते पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे. ध्येय नसेल तर विद्यार्थी जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी निरीक्षण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. पाहणे आणि निरीक्षण करणे यातील फरक विद्यार्थ्यांना कळवा यासाठी त्यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केला. जीवनात मित्र आणि संगत अतिशय महत्त्वाची असते, ती योग्य लाभली तर जीवनाची दिशा बदलते. विद्यार्थ्यांनी आपले आयडॉल बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपले आई-वडील हेच आपले अंतिम आयडॉल असणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना टेन्शन फ्री आयुष्याचा मूलमंत्र दिला. व जीवनात यशवंत होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी यावेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख असणे गरजेचे असल्याचे सांगितले. समाजाचे योग्य रीतीरिवाज, चाली, परंपरा, सामाजिक बंधने यांना अंगीकारून व अनुसरून राहणे व आचरण ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थांनी आपले आई-वडील, गुरुजन, समाज व देशाचा सार्थ अभिमान बाळगावा. नैतिकतेला धरून आपले आचरण ठेवावे. सातत्यपूर्ण अभ्यास व दूरदृष्टीकोन बाळगल्यास यश निश्चित असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज प्रा. आकाश धुमाळ यांनी यावेळेस आपले मनोगत व्यक्त करताना. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाऊन आपला नावलौकिक करावा व आपल्या कुटुंबाचे शाळेचे व समाजाचे नाव अटकेपार पोहोचवावे, आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी निश्चितपणे आपल्या महाविद्यालयाच्या नावाला साजेसा लौकिक घडवून आणतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.संस्थेचे संस्थापक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार व संस्थेचे अध्यक्ष मा. संदिपान पवार यांनी आपल्या महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.इयत्ता बारावीच्या कोरडे अमृत, थिटे वैदेही, जावळे प्रतीक्षा, सैफी अनस व इयत्ता अकरावीची साक्षी गाडगे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. संदिपान पवार, प्राचार्य प्रल्हाद शिंदे, प्रा.आकाश धुमाळ, प्रा. सुभाष घोडे, प्रा. नीलम गायकवाड, प्रा. ज्योती गायकवाड, प्रा. प्रवीण गोरडे, प्रा. पुनम पाटे, प्रा. पुनम कुंभार, प्रा. अजय ननवरे, प्रा. विजय काळे, मा. आनंद अंकुश, श्रीमती पूजा थिगळे, मा. अनिकेत वायकर, अंकिता धायबर, मा.शांताराम गाडगे आदी कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्योती गायकवाड, प्रास्ताविक प्रा. नीलम गायकवाड तर आभार प्रा. सुभाष घोडे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे