बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कावत अँक्शन मोडवर; गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ८० जणांना दिली तंबी

1 min read

बीड दि.८:- बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. जिल्ह्याभरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ८० जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्या हातून घडल्यास एमपीजी, हद्दपारी तसेच मकोकानुसार कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.एकंदरीत गु्न्हेगारी पार्श्वभूमीच्या ८० जणांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलीस दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या कारवाईचा उद्देश बीडमधील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे हा आहे. अधीक्षकांनी या व्यक्तींना भविष्यात गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाईची चेतावणी दिली. या सर्वांना प्रारंभी अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांनी सूचना केल्या. यामध्ये जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी पोलिस दल कठोर पावले उचलत असून यापुढे तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यास यापुर्वीच्या गुन्ह्यांच्या आधारावर मकोका, एमपीडीए तसेच हद्दपारीसारखी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या 80 जणांना देण्यात आला. यानंतर स्वतः पोलिस अधिक्षक नवनित कावत यांनीही या 80 जणांना अशाच पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा भरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले हे सर्वजण होते.आता पोलिस अधिक्षकांनी थेट अशा पद्धतीने कारवाईचा इशारा दिल्याने या 80 जणांसह इतर गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या मंडळींमध्येही जरब निर्माण होत जिल्ह्यात शांतता नांदेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी वातावरण तापल्यानंतर राज्य सरकारने तपासासाठी एसआयटीची स्थापना केली. तसेच सीआयडीच्या माध्यमातून तपासाचे आदेश दिले. राज्य सरकारने तातडीने बीडच्या पोलीस अधीक्षकपदी डॅशिंग आयपीएस अधिकारी नवनीत कावत यांची नियुक्ती केली. नवनीत कावत यांच्याकडून बीडमधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कारवाई केली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटनांचे धागेदोरे सीआयडीच्या हाती लागत आहेत. नवनीत कावत सीआयडीला हवी असणारी मदत करत आहेत. तसेच बीडमधील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी दिवस-रात्र काम करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे