पराभवानंतर पंचाला मारली लाथ; महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ
1 min read
Oplus_131072
अहिल्यानगर दि.२:- अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेतील अंतिम लढतीनंतर गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव करत विजय मिळवला. मात्र, पराभवानंतर शिवराज राक्षेने संतापाच्या भरात पंचाला लाथ मारली आणि त्यांच्या कॉलरला धरल्याने स्पर्धास्थळी एकच गोंधळ उडाला.
पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. पंचांचा निर्णय चुकीचा असाही त्यांनी यावेळेस दावा केला आहे. रागात त्याने पंचाला लाथ मारली आणि कॉलरही पकडली. यामुळे स्पर्धास्थळी तनाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
शिवराज राक्षेने “माझी पाठ टेकली नव्हती” असे म्हणत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतला असून, त्याने लाथ मारल्याचा आरोप फेटाळला आहे. आता महाराष्ट्र कुस्ती महासंघ या प्रकरणी काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.