बी.एड. नंतर एम.एड. देखील आता एक वर्षाचे; २०२६ पासून दोन वर्षांचा अभ्यासक्रम होणार बंद
1 min readपुणे दि.१:- राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीईने नुकताच एक वर्षाचा बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.एड.) अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता देशात एक वर्षाचा मास्टर ऑफ एज्युकेशन (एम.एड.) अभ्यासक्रमदेखील सुरू होणार आहे. आतापर्यंत एम.एड. अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता. २०२६ पासून दोन वर्षांचा एम.एड. अभ्यासक्रम बंद होणार आहे.याविषयी माहिती देताना एनसीटीईचे अध्यक्ष प्रोफेसर पंकज अरोरा म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशींच्या आधारे, यूजीसीने जून २०२४ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. त्याच मार्गदर्शक तत्त्वांनुसार एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. एक वर्षाचा बी.एड, दोन वर्षांचा पदवी शिक्षण कार्यक्रम किंवा ४ वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (आयटीईपी) अभ्यासक्रम अशा तिन्ही श्रेणीपैकी कोणत्याही एक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एक वर्षाच्या एम.एड. अभ्यासक्रम करण्यास पात्र राहणार आहे.