महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार

1 min read

अहिल्यानगर दि.३१:- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ गट अजिंक्य स्पर्धेला बुधवारी (ता.२९) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. हलगी संबळ, तुतारीच्या चैतन्यमय वातावरण, मल्ल एकमेकांना भिडले. प्रारंभी आखाड्याचे पूजन व आराध्य दैवत बजरंगबलीचे पूजन स्पर्धेचे आयोजक संग्राम जगताप यांच्या हस्ते विधिवत पद्धतीने करण्यात आले. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय 150 पंचांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेसाठी दोन मातीचे व दोन मॅटचे आखाडे तयार करण्यात आले आहेत.उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पद्मश्री पोपटराव पवार, आयुक्त यशवंत डांगे, महेंद्र गंधे, अभय आगरकर, सुभाष लोंढे, अनिल शिंदे,  हिंदकेसरी योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, सईद चाऊस यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यानगर शहरात ता. २ फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील सुमारे ९४० मल्लानी सहभाग नोंदविला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे