प्रयागराजला दीडशे भाविक अडकले; मदतीसाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाला साकडे

1 min read

अहिल्यानगर दि.३१:- अहिल्यानगर शहर व तालुक्यातील किमान न दीडशे ते दोनशे भाविक प्रयागराज महाकुंभमेळ्यात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे.

रस्त्यात मागे जात येईना आणि पुढे मध्येच 5 हे भाविक अडकून पडल्याने पिण्याचे पाणी व अन्न देखील त्यांना मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलून या भाविकांना मदत करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन प्रयागराज येथील भाविकांच्या व्यथा मांडल्या आहेत.

नगर तालुक्यातील आरोग्य ग्राम जखणगाव येथून प्रयाग राज महाकुंभ मेळा यात्रेसाठी गेलेल्या दीडशेवर यात्रेकरूंना बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नानाचा मान मिळाला. मात्र, आता ही सर्व मंडळी परतीच्या वाटेवर असताना बुधवारपासून प्रयागराजमध्येच अडकून पडली आहेत. जखणगावचे सरपंच डॉ. सुनील गंधे हे देखील या यात्रेत आहे. त्यांनी नगर शहरातील अनेक नेत्यांशी संपर्क करून
अडकून पडल्याची माहिती दिली. मंगळवारी रात्री उशिरा मौनी अमावस्येला पहाटे कुंभमेळा येथे झालेल्या चेंगराचेंगरी अपघातात ३०च्यावरजण मरण पावले आहेत. तालुक्यातील जखणगाव येथून गेलेल्या दीडशेवर भाविकांना प्रयागराज त्रिवेणी संगम घाटावर शाहीस्नानाची संधी मिळाली. डॉ. सुनील गंधे यांच्या नेतृत्वाखाली प्रयाग राजला भाविक गेले आहेत. परतीचा प्रवास सुरू करताना प्रयागराजमध्ये अहिल्यानगरमधील भाविकांची दिंडी अडकली आहे. यामध्ये जवळपास पाच किलोमीटरपर्यंत कुठेही पाणी
व अन्नाची व्यवस्था नाही. भाविकांची उपासमार सुरू असून, त्यांना मदतीची विशेषतः अन्न-पाण्याची नितांत गरज असल्याचे डॉ. गंधे यांनी सांगितले. कदाचित दोन दिवस एकाच ठिकाणी अडकून पडण्याची भाविकांवर वेळ येणार आहे. मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची व्यवस्था करण्यास प्रशासनाकडून योग्य ती तयारी केल्याचे दिसून आले नाही. पार्किंग व्यवस्थेमध्ये सुद्धा अस्ताव्यस्तपणा व अनियमित्ता दिसून आली. परिणामी रात्री बारा वाजल्यापासून आतापर्यंत आमची गाडी उभी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे