लसणाच्या भावात महिनाभरात निम्म्याने घसरण
1 min read
पुणे दि.२९:- मध्यप्रदेशातून लसणाची आवक वाढली आहे. त्यामुळे मागील महिन्याच्या तुलनेत लसणाच्या भावात निम्म्याने घट झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात महिनाभरापूर्वी ४०० रुपये किलो असलेला लसूण आता २०० रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात पुन्हा लसणाचा वापर वाढला आहे.येथील बाजारात सध्या १० ते १२ टेम्पो लसणाची आवक होत आहे. ही आवक महिनाभरापूर्वी ५ ते ६ टेम्पो होती. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे लसणाचे भाव वाढले होते. या कालवधीत येथील बाजारात अफगाणिस्तानचा लसूण दाखल झाला होता.
मात्र, तो पुणेकरांच्या पसंतीस उतरला नाही. आता मध्य प्रदेश येथील लसणाचा हंगाम सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. गुजरात येथूनही लसूण येथील बाजारात येत असतो. त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.