श्रमसंस्कार शिबिरात किशोरवयीन मुला-मुलींची मोफत रक्तक्षय तपासणी

1 min read

रानमळा दि.२२:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर रानमळा (ता.जुन्नर) येथे शनिवार दि.18 जानेवारी ते शुक्रवार दि. 24 जानेवारी या कालावधीत आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये बुधवार दि. 22 जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष संस्कार हिवाळी शिबिरामध्ये डॉ.असीम अख्तर प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील श्रमसंस्कार शिबिरातील सर्व स्वयंसेवक व गावातील किशोरवयीन मुला मुलींची मोफत रक्तक्षय तपासणी केली. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वच्छता कशी राखावी, त्याचबरोबर आहार कसा घ्यावा याविषयी सखोल मार्गदर्शन डॉ.असीम अख्तर यांनी केले. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी किशोरवयीन मुलांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण गोरडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.माधुरी भोर यांनी केले. आभार प्राध्यापक ननवरे अजय यांनी केले. या कार्यक्रमाकरिता मौजे रानमळा गावच्या प्रथम नागरिक व विद्यमान सरपंच सविता तिकोने, कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योती गायकवाड, जगदीश ताजवे,

राजेंद्र पवार, परदेशी एम के, कोकाटे सौरभ, स्मिता गुंजाळ, इंदिरा गांधी हायस्कूल रानमळा च्या प्रा. जयश्री थोरात, प्रा. माया माळवे, बोटकर जितेंद्र आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे