दरोडेखोर दुकान लुटण्यासाठी आले अन् नागरिकांचा मार खात पळाले

1 min read

कोपरगाव दि.२२:- पोहेगाव (ता. कोपरगाव) येथे काल (ता. २१) भर दिवसा हातात तलवारी घेऊन ज्वेलर्सचे दुकान लुटण्यासाठी दरोडेखोर आले होते. मात्र, त्यांचा डाव सतर्क ग्रामस्थ व दुकानदार यांनी उधळून लावला. त्यातील दोन दरोडेखोर पकडण्यात आले तर एक दरोडेखोर पसार झाला.पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुलात असलेल्या ज्ञानेश्वर माधवराव माळवे (वय ५५) यांच्या सुवर्णकाराच्या दुकानावर काल (मंगळवारी) सायंकाळी ५.४५ वाजता अज्ञात तीन दरोडेखोर तलवारी घेऊन आले होते. त्यांनी दरोडा टाकत दुकानातील सोने चांदी लुटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवत त्यांना घेरावा घालून दगडाचा मारा केला. ग्रामस्थांनी बाजार तळाजवळ त्यातील दोन दरोडेखोरांना पकडले. एक दरोडेखोराने पलायन केले. या झटापटीत दुकानदार ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा हे जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे