आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे विद्यार्थी २४ वर्षांनी आले एकत्र

1 min read

आळेफाटा दि.१७:- आळे (ता.जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सन २०००-०१ मधील इयत्ता पंधरावी (बि.कॉम) च्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचा २४ वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सुरवातीला सरस्वती पुजन करून माजी प्राचार्य डि.बी. दाते, शशिकांत वाळुंज, खंदारे सर , ॲड. संजय टेंबे, स्वर्गीय ठूबे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत महाविद्यालयास वेळोवेळी गरजेची शैक्षणिक मदत करण्यासाठी व एकमेकांना आधार देण्यासाठीचा संकल्प सोडण्यात आला.तसेच तब्बल २४ वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेले होते. तत्कालीन दहावीच्या वर्ग मित्र व मैत्रिणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या स्नेहमेळाव्यामुळे सोनेरी आयुष्यातील रुपेरी आठवणी जागृत झाल्या व तसेच अनेकांना गहिवरून आले होते.या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओळख परेड, स्नेहभोजन तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी मावळ या ठिकाणी ट्रिप काढण्यात आली होती.या स्नेह मेळाव्यासाठी गणपत लामखडे, शरद गाढवे, संजय कुंजीर, सुनिल शिंदे, सुनिल वाकचौरे, अविनाश वाळुंज, विलास डावखर, अब्दुल रजाक सय्यद, विकास वाजे, विकास जाधव, विलास कोरडे आणि उमेश औटी यांनी महत्वाची भूमिका बजावली. याप्रसंगी रवी गुंजाळ, उमेश औटी, विशाल पाटील भुजबळ, शाम हांडे, सचिन डोके, संपत गुंड, सय्यद अब्दुल, अविनाश वाळुंज, बबन सहाने, उत्तम सहाने, प्रवीण लेंडे, सचिन डोके, सूर्यकांत भापकर, शरद ढेरंगे, संतोष भुजबळ, अश्विनी पठाडे, संतोष गुंजाळ, विकास जाधव, मुकेश लुंगे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे