सह्याद्री व्हॅलीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन 

1 min read

राजुरी दि.४ :- सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग राजुरी (ता.जुन्नर) मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे उप -प्राचार्य पी बलरामडू यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख आणि महिला शिक्षक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिले. या प्रसंगी महिला शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि जीवन चरित्र सांगितले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे , विश्वस्त सचिन चव्हाण, प्राचार्य, उप -प्राचार्य पी बलरामडू, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे