कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
1 min read
Oplus_131072
ओतूर दि.२:- कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर मढ (ता. जुन्नर) हद्दीतील सीतेवाडी फाट्यानजीक दुचाकी आणि कारच्या भीषण अपघतात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार, दि.१) रोजी घडली. या घटनेची ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
नीलेश कुटे, पत्नी जयश्री कुटे व मुलगी श्रावणी कुटे (तिघे रा. नवलेवाडी, पिंपरी पेंढार, ता. जुन्नर) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कुटे दाम्पत्य आपल्या मुलीसह ओतूरकडून कल्याणच्या दिशेने दुचाकीवरुन जात होते.
यावेळी कल्याणहून ओतूरच्या दिशेने भरधाव वेगाने कार येत होती. मढ हद्दीतील सीतेवाडी फाट्यानजीक असलेल्या एका हॉटेलसमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील कुटे दाम्पत्यासह मुलगी श्रावणीचा जागीच मृत्यू झाला.
या गंभीर अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप आमने, पोलीस कॉन्स्टेबल युवराज जाधव, किशोर बर्डे, जोतिराम पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली.