राज्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तवला अंदाज
1 min read
पुणे दि.२४:- राज्यात उद्यापासून (ता.२५) ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. २६ ते २८ डिसेंबर पर्यंत पाऊस होईल असा अंदाज आहे. मागील दोन आठवड्यांत राज्यातील अनेक शहरात तापमान ६ अंशांच्या खाली गेले होते. आता मात्र, थंडीची ही लाट ओसरली आहे.हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे. अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.