वाहतूक पोलिसांचे नियम धाब्यावर; ई-चलान मशीनऐवजी मोबाईलमध्येच काढतात फोटो; अढळल्यास तुम्ही पोलिसाविरोधात करू शकता तक्रार; वाचा सविस्तर

1 min read

पुणे दि.११:- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनाचे आणि चालकांचे फोटो काढण्यासाठी सर्व वाहतूक पोलिसांकडे ई-चलान मशीन दिलेल्या आहेत. मात्र राज्यभरातील वाहतूक पोलीस नियम मोडून खासगी मोबाईलमध्ये फोटो काढतात.

Oplus_131072

नंतर तेच फोटो ई-चलान मशीनमध्ये अपलोड करून वाहनचालकांना दंडाच्या पावत्या पाठवतात. चौकातील वाहतूक पोलीस आता अक्षरशः फोटोग्राफर बनले आहेत. पोलिसांची ही पद्धत कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी वाहने दिसताच पोलीस स्वतःचा मोबाईल पुढे करून खासगी मोबाईलमध्ये फोटो काढतात. दरम्यान, वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी ई-चलान मशीनचाच वापर करावा. जे वाहतूक पोलीस कारवाईवेळी खासगी मोबाईलचा वापर करतील.मोबाईलमध्ये फोटो काढतात. नियम मोडणाऱ्यांच्या गाड्यांचे क्रमांक मोबाईलमध्ये टिपतात. नंतर ई-चलान मशीनमध्ये ते अपलोड करून वाहनचालकांना ऑनलाइन दंडाची पावती घरपोच पाठवतात.

दबा धरून बसतात पोलीस…

अनेकदा वाहतूक पोलीस सिग्नल संपला किंवा वळण संपले की दबा धरून थांबलेले दिसतात. अनेकदा आपल्याला नियमांची माहिती नसते आणि ते तो नियम दाखवून पावती फाडतात. यात वाहनचालकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो.

अशी करा तक्रार तर तुमची पावती होते रद्द

ई-चलान मशीनद्वारे फोटो काढलेला नसल्यास आणि संबंधित वाहनचालकाने त्यावर आक्षेप घेऊन तक्रार केली तर मोबाईलद्वारे फोटो काढल्यावर आलेली ऑनलाइन दंडाची पावती रद्द करण्याचा अधिकार वाहनचालकांकडे आहे. याशिवाय जर तुमचे चलान चुकीने काढले गेले असेल, तर तुम्हाला अनेक स्तरांवर ते रद्द करता येते. चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो; त्याविरोधात अपील करण्याचा अधिकार वाहनचालकांना आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे