रानमळा येथे खंडेराय म्हाळसाचा भव्य विवाह सोहळा संपन्न

1 min read

रानमळा दि.५:- रानमळा (ता. जुन्नर) येथे चंपाषष्ठी सोहळा निमित्त श्री कुलस्वामी खंडेरायाचे चरित्र कथा शनिवार दि.३० नोव्हेंबर ते शनिवार दि. ७ डिसेंबर या काळामध्ये मध्ये संपन्न होत आहे. यामध्ये श्री कुलस्वामी खंडेरायाची चरित्र कथा रोज सायंकाळी ६:३० ते ९:३० या वेळेत होत आहे. व त्यानंतर महाआरती संपन्न होणार आहे.या कथेचे आकर्षण म्हणजे यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे दृश्य सादर केले जातात. बुधवार दि.४ रोजी रात्री हभप डॉ. गजानन महाराज काळे यांनी म्हाळसादेवीचा परिचय, देवघरात जास्त देव कां नसावे, पौर्णिमेचे महत्त्व, खंडेराव व म्हाळसा विवाह पालीला का झाला? अशा विविध मुद्द्यांवरती कथा सांगितली तसेच म्हाळसा देवी व खंडेरायाचा अप्रतिम विवाह सोहळा दृश्य स्वरूपात सादर करण्यात आला. यावेळी मांडव डहाळे घेऊन चक्क बैलगाडी मंडपात आणण्यात आली. रुखवत घेऊन गावातील महिला आल्या, देव देवता आले. मंगल अष्टक कामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. खंडेरायाच्या भूमिकेत पप्पू गुंजाळ तर म्हाळसाच्या भूमिकेत त्यांची पत्नी मनीषा गुंजाळ या होत्या. तसेच विवाह सोहळा झाल्यानंतर महाआरती झाली व त्यानंतर वरातीमध्ये घोड्याचा डान्स झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे