नळवणे येथील श्री कुलस्वामी खंडेराय चंपाषष्ठी महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम

1 min read

आणे दि.२ (वार्ताहर):-जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील महाराष्ट्राचे कुलदैवत समजल्या जाणाऱ्या श्री कुलस्वामी खंडेरायाच्या श्री क्षेत्र नळवणे (ता.जुन्नर) गडावर शनिवार (दि.७) रोजी चंपाषष्ठी महोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच श्री कुलस्वामी खंडोबा मंदिर जीर्णोद्धार व सुवर्ण कलशारोहन १८ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने गडावर सकाळ पासून विविध गडावर विविध कार्यक्रम असणार आहे. यामध्ये पहाटे ५ वा श्री मंगलस्नान व महाभिषेक अभिषेक सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत पालखी मिरवणूक सोहळा व महाआरती,११ नंतर श्री ला नेवेद्य व आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता कुलस्वामी खंडेरायाचे जागरण. सायंकाळी ४ ते ६ हभप यशवंत महाराज थोरात यांचे हरिकीर्तन होईल. रात्री ८ नंतर शोभेची दारू उडवण्याचा कार्यक्रम असेल. तसेच चंपाषष्ठीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून देवस्थानने गडावर भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले. तसेच भाविकांसाठी शुद्ध पिण्याची पाण्याची व्यवस्था तसेच पार्किंग व्यवस्था व भाविकांना श्री चे दर्शन सुलभ व्हावे. यासाठी खाजगी सुरक्षा व्यवस्था केली असून आळेफाटा पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.अशी माहिती श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थान चे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली. सर्व भाविकांनी श्री चे दर्शन व महाप्रसाद रांगेतून घ्यावा. देवस्थानच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन गगे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे