आळेफाटा उपबाजारात कांद्याला उच्चांकी भाव
1 min read
आळेफाटा दि.३०:- जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात शुक्रवारी (दि.२९) नवीन लाल सेंद्रिय कांद्याची हंगामातील उच्चांकी आवक झाली. २१ हजार ७० गोणी कांदा येथे विक्रीस आला होता. प्रति १० किलो गावरान कांद्यास ७००, तर नवीन लाल कांद्यास ५८१ रुपये कमाल भाव मिळाला, अशी माहिती सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे यांनी दिली.
प्रति १० किलोस मिळालेले भाव:- नवीन लाल कांदा – एक्स्ट्रा गोळा ५५० ते ५८१ रुपये, सुपर गोळा ५०० ते ५५० रुपये, सुपर मीडीयम ४५० ते ५०० रुपये, गोल्टी व गोल्टा २५० ते ४२५ रुपये, बदला व चिंगळी १५० ते २५० रुपये. गावरान कांदा – ३०० ते ७०० रुपये.
आळेफाटा उपबाजारात गावरान कांदा विक्रीस येण्याचे प्रमाण कमी झाले असून, शुक्रवारच्या लिलावत १२५ पिशवी कांदा विक्रीस आला होता.