पंधरा गुंठयांत शेवंती ने दिला लाख रुपयांचा नफा
1 min read
बेल्हे दि.२६:- कांदळी येथील प्रगतशील शेतकरी अनिल राधू कोकाटे यांनी अवघ्या पंधरा गुंठयांत शेवंती चे यशस्वी पिक घेत लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
कांदळी (ता.जुन्नर) हे गाव कुकडी नदीच्या तीरावर वसलेले असल्या कारणाने येथील बहुतेक शेतकरी आप आपल्या शेतात नवनवीन प्रयोग नेहमीच करत असतात. असाच प्रयोग येथील प्रगतशील शेतकरी अनिल राधू कोकाटे हे चांगल्या प्रकारे शेती करत असुन नेहमी ते
आपल्या शेतात दरवर्षी नवनवीन पिके घेऊन भरघोस असे उत्पादन घेत असतात. त्यांनी या वर्षी शेवंती या फुलाचे उत्पादन घेतले. हे उत्त्पादन घेण्या अगोदर त्यांधी आपले शेतातले पंधरा गुंठे क्षेत्र निवडले त्यात त्यांनी शेत खत घातले.
चांगल्या प्रकारची नांगरणी करून तसेच ते पाळी घातली नंतर चार फुटाच्या अंतरावर सरी काढली. नंतर त्यांनी मंचर येथुन कलकत्ता व्हाईट बंगलोर या जातीची शेवंतीची सुमारे २ हजार ७०० रोपे आणुन ती साधारण सव्वा फुटाच्या अंतरावर लावली.
त्यांनी ही लागवड साधारण जन महीण्याच्या पहिल्या आठवड्यात केली. या संपुर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केली तसेच व कुठल्याही प्रकारचे रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताचा वेळोवेळी वापर तर औषधे फवारणी केल्यानंतर साधारण चार महीण्यांनंतर या पिकाला चांगल्या प्रकारे
फुले येऊन आतापर्यंत अडीच टन फुले विकली आहेत. व या फुलांना ४० रुपयां पासुन १२० रूपये किलो बाजार भाव मिळाला असुन यासाठी खर्च ५० हजार रुपये आला असून झालेला खर्च वजा जाता १ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे व अजुन ५०० ते ७०० किलो माल निघणार आहे व या मधुन वीस ते तीस हजार रुपये मिळतील अशी माहिती कोकाटे यांनी दिली.
तसेच शेवंतीची बाग साधारण दोन ते तीन वर्ष चालतो. त्यामुळे या पिकातुन पुढील वर्षी खर्च कमी येऊन त्यांना चांगल्या प्रकारचा नफा मिळणार आहे.
“शेवंती या फुलांची लागवड करत असताना दोन ओळीतील अंतर जास्त ठेवल्याने तोडणी करण्यास सोपे जाते. हवा खेळती राहून किडी रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच ह्युमिक ऍसिड यांच्या बरोबरीने शेणखत व कोंबडी खत देण्यावर कोकाटे यांचा भर दिल्याने फुले चांगली आली आहेत व विशेष म्हणजे फुलांच्या वजनाने झाड खाली वाकू नये यासाठी रोपांना आधार देण्यासाठी बांबूंचा मांडव तयार केल्याने झाडे वाकली नाहीत.
सध्या या फुलांना दिवाळीनंतर बाजारभाव कमी झाला. तरी या फुलांना येणा-या मार्गशीर्ष महिन्यात तसेच गावोगावी चालु होणा-या यात्रा, लग्न सराईत बाजारभाव वाढ होणार आहे. त्यांना या पिकासाठी पत्नी मंगल, मुलगा ऋषिकेश यांचे शिक्षण बी.एस.सी ॲग्री चे शिक्षण झाल्यामुळे त्याचेही मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.” :- अनिल कोकाटे, प्रगतशील शेतकरी
बाजारभाव बाजार सन २०२१ एका किलोस ३० ते १०० रूपये, सन २०२२ एका किलोस ४० ते १०० रूपये, सन २०२३ एका किलोस ३५ ते १५० रूपये, सन २०२४ एका किलोस ४० ते १२० रूपये तसेच दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र, यात्रौत्सवाच्या काळात या फुलांना बाजारभाव जवळपास २०० ते ३०० रूपये किलोपर्यंत जात असतो.