जुन्नरमध्ये सव्वातीन लाख मतदार;३५६ मतदान केंद्र;१६५० कर्मचारी
1 min read
जुन्नर दि.१८:- जुन्नर विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदार १६५३७६ व स्त्री मतदार १६०३८५ असे एकूण ३ लाख २५ हजार ७६४ मतदार आहेत. या मतदारांची मतदान प्रक्रिया राबविणेसाठी ३५६ मतदान केंद्रांवर एकूण १६५० कर्मचारी, राखीव कर्मचारी २४२, शिपाई कर्मचारी ४५७, पोलीस शिपाई ३५६ यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली.जुन्नर विधानसभा सार्वत्रिक पोलिसांचा फौजफाटा तालुक्यात तैनात करण्यात आला असून १६५० कर्मचाऱ्यांची केली नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने बुधवारी (दि. २०) मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदार यादीमध्ये नाव शोधावयाचे असलेस व्होटर हेल्पलाईन अॅपद्वारे मतदार आपले नाव पाहू शकतात.
१०० मीटर परिसरात मोबाइल आणण्यास मज्जाव आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या १२ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदार मतदान करू शकतात. मतदान केंद्रांवर किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणेत आलेल्या आहेत.
या मतदान प्रक्रियेसाठी १ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३६ पोलीस अधिकारी (एपीआय / पीएसआय) ३५६ पोलीस अंमलदार, २८४ होमगार्ड, ९६ सीआयएसएफ कंपनी याप्रमाणे ३६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक आचारसंहिता कक्षांतर्गत सोमवार (दि. १८) अखेरपर्यंत ३ ऑफलाइन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या निकाली काढण्यात आलेल्या आहेत.
तसेच सिवीजिल अॅपवर प्राप्त झालेल्या ४२ तक्रारी एफएसटी पथकाद्वारे ९० मिनिटांचे आत निकाली काढण्यात आलेल्या आहेत. ४ ठिकाणी उभारणेत आलेल्या एसएसटी पथकाकडून ५ ठिकाणी वाहन व दारू वाहतुकीबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
३५६ मतदान केंद्रांसाठी ३६ क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्रांवरील साहित्य वाटपासाठी एकूण ३६ टेबल लावण्यात आलेले आहे. त्यासाठी १४४ कर्मचा-यांनी नियुक्ती करणेत आलेली आहे. साहित्य स्विकृतीसाठी ३८ टेबल करण्यात आलेले आहे. त्यामध्ये १५० कर्मचा-यांची नियुक्ती करणेत आलेली आहे.
पोस्टल मतदानासाठी येणा-या अधिकारी व कर्मचारी यांचे टपाली मतदानासाठी ११ फॅसिलेशन केंद्र बनविणेत आले असून राखीव २ टीम ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण ६५ अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत.