जुन्नर विधानसभेच्या निवडणूक रिंगणात १७ उमेदवार; २९ उमेदवारी अर्ज वैध

1 min read

Oplus_131072

जुन्नर दि.३०:- महायुतीचे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस श.प. गटाचे सत्यशील शेरकर, देवराम सखाराम लांडे (वंचित बहुजन आघाडी), बहुजन समाज पार्टीचे जुबेर अस्लम शेख निवडणूक लढवत असून या चार राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे अधिकृत उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे मारुतीच्या भाजपच्या बंडखोर उमेदवार आशा दत्तात्रय बुचके, अपक्ष शरद सोनवणे, अपक्ष काळू गागरे, निलेश भुजबळ, योगेश तोडकर, रमेश हांडे, रमेश पाडेकर, राजेंद्र ढोमसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जुन्नर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे,

आकाश आढाव, राजेंद्र ढोमसे, सुखदेव खरात या सर्वांचेच उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले असून एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २९ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेवाळे यांनी दिली.

शरद सोनवणे या नावाचे तीन उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरण्यात आले आहेत. यामध्ये माजी आमदार शरद भिमाजी सोनवणे तसेच मांजरगाव तालुका निफाड, जिल्हा नाशिकचे शरद शिवाजी सोनवणे व हिंगणगाव तालुका नगर जिल्हा नगर येथील

शरद बाबासाहेब सोनवणे यांचे उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यात आले आहेत. दरम्यान येत्या चार नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी नंतर निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे