आमदार अतुल बेनके भरणार उद्या उमेदवारी अर्ज

1 min read

जुन्नर दि.२७:- तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा विचार जपण्याची संस्कृती जपण्याचे काम स्वर्गीय वलभ बेनके यांच्या नंतर मी करीत आहे आणि पुढेही करीत राहीन. तालुक्यातील कानाकोपर्यातून मला मिळणारा पाठिंबा बघता देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काहीही जरी घडले असले. तरी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून अतुल बेनकेच पाहिजे, अशी लोकभावना निर्माण झाली असून विधानसभा निवडणुकीत मतदार विरोधकांना करारा जबाब देणार, असे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे.जुन्नर तालुक्यातील सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन महायुतीतील घटक पक्षांशी एकत्रित समन्वय झाल्यानंतर पदाधिकार्यांच्या व महिलांच्या हस्ते सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे शनिवारी (दि. २६) घेतलेल्या पत्रकारपरिषदेत आमदार बेनके यांनी नमूद केले. आमदार बेनके म्हणाले की,आमदार म्हणून मी पाच वर्षे जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीत आलो आहे. विरोधी पक्षातील कार्यकत्यांच्या गावामध्ये जनतेच्या हितासाठी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील विकासाची कामे काही प्रमाणात राहून गेली असतील, परंतु पुढील काळात पूर्ण केली जातील. माझ्यावर विश्वास ठेवून उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जुन्नर तालुक्याची उमेदवारी मला दिली तो विश्वास मी सार्थ करीन याची खात्री आहे. स्व. वल्लभ बेनके यांची जुत्रर तालुक्याच्या विकासाची राहिलेले कामे पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे