प्रारुप मतदार यादीत जुन्नर तालुक्यात ३ लाख १४ हजार मतदार तर जिल्ह्यात ८४ लाख ३९ हजार मतदार

1 min read

पुणे, दि.८: भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६) प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्रावर ८४ लाख ३९ हजार ७२९ मतदार असून त्यामध्ये ४४ लाख ३ हजार ३४४ पुरुष, ४० लाख ३५ हजार ६४० महिला आणि ७४५ तृतीयपंथीय मतदार आहेत. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.या यादीनुसार जुन्नर विधानसभा मतदासंघात ३५६ मतदान केंद्र असून १ लाख ६१ हजार ८९ पुरुष, महिला १ लाख ५३ हजार ७४४ तसेच तृतीयपंथीय ६ असे एकूण ३ लाख १४ हजार ८३९ मतदार आहेत. आंबेगाव मतदार संघात ३४१ मतदान केंद्र असून पुरुष मतदार १ लाख ५५ हजार ५५८, महिला १ लाख ४८ हजार ७०० आणि तृतीयपंथीय ८ असे एकूण ३ लाख ४ हजार २६६ मतदार आहेत.खेड आळंदी मतदार संघात ३८९ मतदान केंद्र, पुरुष मतदार १ लाख ८५ हजार ३५९, महिला १ लाख ७१ हजार ७३४ आणि तृतीयपंथीय १२ असे एकूण ३ लाख ५७ हजार १०५ मतदार आहेत. शिरूर मतदार संघात ४५७ मतदार केंद्र, पुरुष २ लाख ३२ हजार ६३३, महिला २ लाख १२ हजार ६४६ आणि तृतीयपंथीय २१ असे एकूण ४ लाख ४५ हजार ३०० मतदार आहेत.

दौंड मतदार संघात ३१० मतदान केंद्र, पुरुष संख्या १लाख ५८ हजार ८४०, महिला १ लाख ४८ हजार १९२ आणि तृतीयपंथीय १० असे एकूण ३ लाख ७ हजार ४२ मतदार, इंदापूर मतदार संघात ३३७ मतदान केंद्र असून १ लाख ६८ हजार ३६४ पुरुष, १ लाख ५७ हजार १६४ महिला आणि तृतीयपंथीय १२ असे ३ लाख २५ हजार ५४० मतदार आहेत.

बारामती मतदार संघात ३८६ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ८९ हजार ७०१, महिला १ लाख ८१ हजार ८५६ आणि तृतीयपंथीय २० असे ३ लाख ७१ हजार ५७७ मतदार आहेत. पुरंदर मतदार संघात ४१३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख २८ हजार ५७०, महिला २ लाख ७ हजार ८१३ आणि तृतीयपंथीय ३१ असे ४ लाख ३६ हजार ४१४ मतदार आहेत.

भोर मतदार संघात ५६४ मतदान केंद्र, पुरुष २ लाख १९हजार ३३१, महिला १लाख ९३ हजार ७९ आणि तृतीयपंथीय ४ असे ४ लाख १२ हजार ४१४ मतदार आहेत. मावळ मतदार संघात ४०२ मतदान केंद्र, पुरुष १लाख ९३ हजार ३७, महिला १ लाख ८२ हजार ७२० आणि तृतीयपंथीय १३ असे ३ लाख ७५ हजार ७७० मतदार आहेत.

चिंचवड मतदार संघात ५६१ मतदान केंद्र, ३ लाख ३२ हजार ५९२ पुरुष, २ लाख ९४ हजार ७९७ महिला आणि तृतीयपंथीय ४८ असे ६ लाख २७ हजार ४३७ मतदार आहेत. पिंपरी (अ.जा.) मतदार संघात ३९८ मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ९८ हजार २३८, महिला १ लाख ७८ हजार ९८३ आणि तृतीयपंथीय ३० असे ३ लाख ७७ हजार २५१ मतदार आहेत.

भोसरी मतदार संघात ४८३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख ५ हजार ८५५, महिला २ लाख ५३ हजार ९ आणि तृतीयपंथीय ९५ असे ५ लाख ५८ हजार ९५९ मतदार आहेत. वडगांव शेरी मतदार संघात ४३७ मतदान केंद्रे, पुरुष २लाख ४७ हजार ६३८, महिला २ लाख २८ हजार ८०० आणि तृतीयपंथीय १०० असे एकूण ४ लाख ७६ हजार ५३८ मतदार आहेत.

शिवाजीनगर- २८० मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ४३ हजार ६, महिला १ लाख ३८ हजार ७८३ आणि तृतीयपंथीय ४२ असे २ लाख ८१ हजार ८३१ मतदार, कोथरूड- ३८७ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख २० हजार ४०३, महिला २ लाख ६५५ आणि तृतीयपंथीय २१ असे ४ लाख २१ हजार ७९ मतदार आहेत.

खडकवासला मतदार संघात ५०५ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख ९० हजार ३४४, महिला २ लाख ५५ हजार ५१० आणि तृतीयपंथीय ३९ असे ५ लाख ४५ हजार ८९३ मतदार, पर्वती मतदार संघात ३४४ मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ७६ हजार ४०५, महिला १ लाख ६८ हजार २४२ आणि तृतीयपंथीय ९२ असे एकूण ३ लाख ४४ हजार ७३९ मतदार आहेत.

हडपसर मतदार संघात ५२५ मतदार केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख १२ हजार ३७७, महिला २ लाख ७८ हजार १६३ आणि तृतीयपंथीय ७१ असे ५ लाख ९० हजार ६११ मतदार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) मतदार संघात २७४ मतदान केंद्रे असून यात १ लाख ४५ हजार ९७६ पुरुष. १ लाख ४० हजार ५०७ महिला आणि ३५ तृतीयपंथीय असे २ लाख ८६ हजार ५१८ मतदार आहेत. कसबा पेठ मतदार संघात २६८ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ३८ हजार २८, महिला १ लाख ४० हजार ५४३ आणि तृतीयपंथीय ३५ असे २ लाख ७८ हजार ६०६ मतदार आहेत.

*२० ऑगस्टपर्यंत दावे व हरकती सादर करावेत*
या प्रारुप मतदार यादीच्या अनुषंगाने २० ऑगस्टपर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहेत. यादरम्यान मतदार यादीत नाव नसल्यास नोंदणीसाठी अर्ज नमुना क्रमांक ६, नाव समाविष्ट करण्यास हरकत, यादीत यापूर्वीच समाविष्ट असलेले नाव वगळणे. स्थलांतर झाल्यामुळे नाव वगळणे आदींसाठी नमुना क्र. ७, पत्ता बदल, तपशीलात दुरुस्ती, दुबार इपीक कार्ड मिळणे आदींसाठी नमुना क्र. ८ हे अर्ज ऑनलाईनरित्या भरता येतील. त्याशिवाय संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे आवश्यक पुराव्यांसह अर्ज सादर करता येतील, असेही कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे