वृद्ध कलाकार मानधन निवड समिती स्थापन करा:- पांडुरंग पवार

1 min read

जुन्नर दि.५:- कीर्तन, जागरण, प्रवचन, समाज प्रबोधन,तमाशा, नाटक, नृत्य, अशा महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम केलेल्या वृद्ध कलाकारांना शासनामार्फत मासिक मानधन योजना राज्यात गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. वेगवेगळ्या कलाकारांना त्यांच्या श्रेणीनुसार मानधन मिळते.

नुकतीच शासनाने या मानधनात वाढ देखील केली आहे. दोन वर्षांपूर्वी ही लाभार्थी निवड समिती बरखास्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थी निवड करण्यात अडचणी येतात. परिणामी लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळत नाही.

सदस्य लाभार्थी निवड समिती शासनाने लवकर गठीत करावी त्यामुळे लाभार्थी निवडीचा मार्ग मोकळा होईल अशी मागणी पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे