जुन्नरमध्ये फूड प्रोसेसिंग पार्क साठी राज्य शासन सकारात्मक:- उपमुख्यमंत्री अजित पवार

1 min read

पुणे दि.१: – डुंबरवाडी (ता. जुन्नर) येथे राज्यासह केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

एमआयडीसीची आढावा बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अतुल बेनके (व्हीसीद्वारे) आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यात फूड प्रोसेसिंग पार्क उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदारांसोबत जागेची पाहणी करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.

पवार म्हणाले की, एमआयडीसी उभारणीसाठी किमान शंभर एकर जमिनीची उपलब्धता आवश्यक आहे. तसे असेल तरच सर्वसोयींनीयुक्त एमआयडीसी उभी राहू शकते. त्याचबरोबर बारामती एमआयडीसी मधील प्रलंबित कामे, चाकण एमआयडीसीतील शेतकऱ्यांच्या प्रश्ना विषयीही चर्चा करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे