शिरूर लोकसभेसाठी ४६ अर्जा पैकी ३५ अर्ज वैध

पुणे, दि.२७ – पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार दि.२५ शेवटचा दिवस होता. त्यामुळे या तीनही मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ४२ उमेदवारांनी अर्ज भरले.सर्व अर्ज वैध ठरले. शिरूर मतदारसंघासाठी ४६ उमेदवारांनी अर्ज भरले होते त्या पैकी ३५ अर्ज वैध ठरले. तर मावळमधून एकूण ३८ उमेदवारांनी अर्ज भरले होते त्या पैकी ३५ अर्ज वैध ठरले.
उमेदवारांच्या अर्जाची छाननी शुक्रवारी (दि. २६) झाली.तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत येत्या सोमवारपर्यंत (दि. २९) आहे. त्यामुळे या तीनही मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र मावळमधून ३८ उमेदवारी अर्ज दाखल सोमवारीच स्पष्ट होणार आहे.
पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १८ एप्रिलपासून सुरुवात झाली. याआधी पुणे मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन विकास आघाडीकडून वसंत मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,
तर आज भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रमुख उमेदवारांसह पुणे मतदारसंघातून एकूण ४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार या पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून एकूण ४६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
या तीनही मतदारसंघांतील उमेदवारांच्या अर्जाची छाननी शुक्रवारी सकाळी झाली. त्यानंतर अर्ज माघारीनंतर म्हणजे सोमवारी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.