सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरापुढे मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचा ठिय्या
1 min read
मंचर दि.१८:- मराठा समाजाच्या एकजुटीचे पुन्हा दर्शन घडले, आंतरवाली सराटी तर मनोज जरांगे पाटलांचे ऊपोषण मराठा आरक्षणासाठी नवव्या दिवशीही सुरूच असून राज्यकर्ते दखल घेत नसल्याने मंचर येथील रविवार दि.१८ रोजी मराठा समाजबांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढुन. मराठा आरक्षण संदर्भात विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात आंबेगाव तालुक्याचे आमदार तथा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा या मागणीसाठी वळसे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
अंकुश लांडे, वसंत बाणखेले, आशिष घोलप, बाबाजी चासकर यांची भाषणे झाली.यावेळी गणेश खानदेशे, सुरेश निघोट, प्रा.राजाराम बाणखेले, बाळासाहेब बाणखेले, संजय चिंचपुरे सागर गव्हाणे, कुणाल बाणखेले, संदिप जुन्नरे, परशुराम भेके, राजू निघोट यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचे निवेदनाचा स्वीकार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड विष्णूकाका हिंगे पाटील, ना. वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक विजय थोरात यांनी केला. यावेळी राजेंद्र थोरात, सुहास बाणखेले, सतिश बेंडे, लक्ष्मण थोरात, प्रविण मोरडे, संजय बाणखेले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंचर पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.