धर्मवीर छावा प्रतिष्ठान च्या वतीने विद्यार्थांना २०० लिंबोणीच्या रोपांचे वाटप

1 min read

निमगाव सावा दि.९ :- धर्मवीर छावा प्रतिष्ठान यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा (ता.जुन्नर) या शाळेमधील विद्यार्थ्यांना 200 लिंबोणीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे तसेच पर्यावरणाचे विषयी जागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हे वाटप पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावचे सरपंच किशोर घोडे, धर्मवीर छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदीप थोरात, विद्यमान अध्यक्ष सुरेश घोडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम लगड, शालेय समितीचे अध्यक्ष इरफान पटेल, अनिस पठाण, संतोष गाडगे, परेश घोडे, रविंद्र शेगर, संदिपान पवार अध्यक्ष श्री पांडुरंग ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, अक्षय घोडे, प्रवीण घोडे. साजिद पटेल, बाळा उनवणे व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना पांडुरंग पवार यांनी सांगितले की गावांमधील तसेच परिसरामधील ज्या मोकळ्या जागा आहे. त्या ठिकाणी देखील वृक्षारोपण होण गरजेच आहे. तसेच त्याचं देखभाल व संवर्धन शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत होणे गरजेचे आहे. अशी सूचना त्यांनी यावेळी केली व धर्मवीर छावा प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक संतोष साळुंके यांनी केले व आभार शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा गोंदके यांनी मांडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे