श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट माळवाडी (बोटा) संस्थेचा प्लेसमेंट आलेख उंचावला:अध्यक्ष डॉ. शिवाजी पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कॅम्पस प्लेसमेंट विद्यार्थ्यांचा सत्कार
1 min read
माळवाडी (बोटा) दि.२६:- श्री स्वामी समर्थ संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आदरणीय डॉ. शिवाजी पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूटमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
संस्थेच्या वाढत्या प्लेसमेंटचा आलेख यावेळी विशेष चर्चेचा विषय ठरला. सन 2023-24 मध्ये 22 विद्यार्थी, 2024- 25 मध्ये 35 विद्यार्थी तर 2025-26 मध्ये आतापर्यंत 18 विद्यार्थ्यांची Cipla, Mecleoid, Genome Biotics, Medplus, wellness forever, Emcure, Encube Ethical यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे
. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या कंपन्यांमध्ये मिळवलेले हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे मान्यवरांनी सांगितले. 📈 संस्थेचा प्लेसमेंट आलेख
▇▇▇▇▇▇▇▇ 2023-24 → 22 विद्यार्थी
▇▇▇▇▇▇▇▇▇▇▇▇ 2024-25 → 35 विद्यार्थी ▇▇▇▇▇▇ 2025-26 → 18 विद्यार्थी (आतापर्यंत) यावेळी डॉ. अमित पोखरकर यांनी सांगितले
की, “श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ही केवळ शैक्षणिक संस्था नसून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडविणारी ऊर्जा आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत रोजगाराभिमुख कौशल्ये देणे हेच संस्थेचे ध्येय आहे.”डॉ. शिवाजी पोखरकर यांनी आपल्या मनोगतात म्हणाले,
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व रोजगारा भिमुख शिक्षण देणे हेच आमचे ध्येय आहे. आज संस्थेचा वाढता प्लेसमेंट आलेख पाहून समाधान वाटते. मोठ्या नामांकित कंपन्या थेट माळवाडीतील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी देत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
आज संस्थेमध्ये Engineering, Pharmacy,MBA, MCA, BBA, BCA, Agriculture, ITI तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध असून संस्था विद्यार्थ्यांसाठी स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन आणि उत्कृष्ट प्लेसमेंट संधी उपलब्ध करून देत आहे.
