जुन्नर तालुक्यात फुलली विड्याच्या पानाची शेती
1 min read
बेल्हे दि.२१:- जुन्नर तालुक्यात बोटावर मोजता येतील इतकेच पानमळे असुन दिवसेंदिवस पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षापासून हि शेती करण्याचे प्रमाण घटत असल्याचे चित्र दिसत असुन आता क्वचितच एखादा पानमळा पहावयास मिळत आहे. तांबेवाडी (ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वर कोंडीबा बांगर हे अनेक वर्षांपासून आपल्या शेतात विड्याच्या पानाची शेती करत आहेत.
कोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी विड्याच्या पानाला मानाचे आणि महत्त्वाचे स्थान असते. विविध समारंभात, छोट्या घरगुती कार्यक्रमात मुखशुद्धीकर म्हणून विड्याचे पान दिले जातेच. त्यामुळे विड्याचे पान सगळ्यांना सुपरिचित आहेच! विड्याचे पान औषध म्हणूनही तितकेच महत्त्वाचे काम करत असते.
बांगर यांनीट चार गुंठे क्षेत्राची निवड केली. त्यानंतर या पिकाला गारवा तसेच पाने सुकू नये म्हणून सावली मोठ्या लागते. यासाठी चार बाय सहा फुटाची सरी काढुन घेतली. यामध्ये शेवरीची झाडे पाच पाच फुटांच्या अंतरावर लावली. चारही बाजुने हत्ती गवत लावुन घेतले त्यानंतर दोन महिन्यांनंतर हि झाडे मोठी झाल्यानंतर दोन शेवरीच्या
झाडांच्या मधोमध इंदापुर या ठिकाणाहुन आणलेली ५५० रोपे आणुन लावली.बांगर यांनी या पिकाला एक ट्रॉली शेणखत टाकले वेळोवेळी पाणी सोडण्यात आले. या पिकासाठी त्यांना फक्त १५ हजार रूपये खर्च आला असुन सध्या पानाला तीस ते चाळीस रूपयांचा शंभर पाने
विकली जात आहे. खर्च वजा जाता एका वर्षात ८० हजार रुपयांचा नफा त्यांना मिळाला आहे. दररोज १ हजार पाने निघत आहेत या मधुन दररोजचे चालु बाजाराप्रमाणे चारशे रुपये मिळत आहे. हे पिक अजुन पाच वर्षे चालणार आहे.
प्रतिक्रिया
‘पानमळयाची शेती करताणा मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. हे करत असताना वादळी पाऊसाचा फटका या पिकाला बसला तर संपुर्ण पिक वाया जाते. या मुळे शेतक-याचे मोठे नुकसान होत असते शिवाय या पिकाला शासणाचे कोणतेही अर्थिक सहाय्य नसल्यामुळे याची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली आहे.
या पानमळयांवर रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाठ फिरवल्याने या पिकाला बाजारात चांगली किंमत नसल्याने शेतकरी हे पिक घेण्यास टाळत आहेत. पान हे गुणकारी औषध असल्याने याचा उपयोग कफ कमी करण्यासाठी,श्वसनाचा त्रास होत असल्यास, पावसात भिजणे आणि हवाबदलामुळे सर्दीचा त्रास होत असल्यास व भूक वाढवण्यासाठी आणि अन्नपचनासाठी चांगला उपयोग होत आहे.’
ज्ञानेश्वर बांगर, शेतकरी
