पंढरपूर मधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा भक्त निवासासाठी विकसित करणार:- मंत्री शंभूराज देसाई
1 min read
पंढरपूर दि.१५:- पंढरपूर येथे पाच एकर जागेत माजी सैनिक कल्याण विभाग, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे देवस्थान व पर्यटन विभागाच्या समन्वयातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा भक्त निवासासाठी विकसित करण्याची कार्यवाही पर्यटन विभागाने करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पंढरपूर येथील पर्यटन विभागाच्या जागेच्या विकासासंदर्भात आयोजित बैठकीत दिले.
यावेळी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज (औसेकर) कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
